सातारा : लग्नाच्या आमिषाने युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, साताऱ्यात रहिवासी असणाऱ्या एका युवतीस तुझ्याबरोबर लग्न करणार आहे, असे आमिष दाखवून वैभव सुरेश कदम रा. मातोश्री पार्क, सातारा याने संबंधित युवतीवर दि. 4 डिसेंबर रोजी अत्याचार केले. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक राठोड करीत आहेत.