सातारा : सातारा बस स्थानक परिसरातून अज्ञात चोरट्याने सुमारे सात तोळे वजनाच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २६ रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास शुक्रवार पेठ, रामापुर, ता. पाटण येथील एका महिलेचे सहा तोळे नऊ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने सातारा बस स्थानक परिसरातून अज्ञात चोरट्याने चोरून नेले आहेत. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बिले करीत आहेत.