सातारा : पोवई नाका परिसरात वीज दुरुस्तीचे काम करताना पोलवरून पडून एका कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. धनंजय विलास पवार (वय ३९, रा. मांडवे) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
दि. २५ एप्रिल रोजी सायंकाळी काम सुरू असताना त्यांचा तोल जाऊन ते खाली कोसळले. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. वैद्यकीय उपचार सुरू असतानाच दि. २८ एप्रिल रोजी सायंकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.