भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा शेवटचा कसोटी सामना सिडनी येथे खेळला जात आहे. सिडनी कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ आता संपला आहे. यामध्ये दोन्ही संघाच्या गोलंदाजांनी कमालीची कामगिरी केली आहे. दुसऱ्या इनिंगमध्ये भारताची धावसंख्या ६ विकेट गमावून १४१ धावा आहे. भारतीय संघाकडे सध्या १४५ धावांची आघाडी आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी एकूण १५ विकेट पडल्या. मात्र, विकेट पडण्याच्या काळात ऋषभ पंतने थांबण्यास नकार देत झंझावाती अर्धशतक झळकावले. कांगारू संघाने पहिल्या डावात १८१ धावा केल्या. भारताच्या गोलंदाजांनी कमालीची कामगिरी केली यामध्ये टीम इंडियासाठी एक निराशाजनक बातमी आहे.
भारताचा कर्णधार जसप्रीत बुमराहला चालू सामन्यांमध्ये मैदान सोडावे लागले त्याचबरोबर तो ड्रेसिंग रूमनंतर लगेचच गाडीमध्ये बसून त्याला स्कॅनिंगसाठी नेण्यात आले होते. पहिल्या दिनाच्या खेळाबद्दल बोलायचं झालं तर पहिल्या इनिंगमध्ये भारताच्या संघाला ऑस्ट्रेलियाने १८५ धावांवर रोखले होते. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने फलंदाजी करत १ विकेट गमावून ९ धावा केल्या होत्या. दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला जसप्रीत बुमराहने मार्नस लाबुशेनला आपला बळी बनवले. लॅबुशेनने ८ चेंडूत २ धावा केल्या आणि बुमराहचा बळी ठरला. यानंतर सिराजने सॅम कॉन्स्टन्सला बोल्ड केले, सॅम कॉन्स्टासने ३८ चेंडूत २३ धावांची खेळी केली.
यानंतर ट्रॅव्हिस हेडने ४ धावा, स्टीव्ह स्मिथने ३३ धावा, ॲलेक्स कॅरीने २१ धावा, पॅट कमिन्सने १० धावा, मिचेल स्टार्कने १ धाव, ब्यू वेबस्टरने १०५ चेंडूत ५७ धावा आणि स्कॉट बोलंडने ९ धावा केल्या. नॅथन लियॉन ७ धावा करून नाबाद राहिला. भारताकडून प्रसिध कृष्णा आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले. त्याच्याशिवाय जसप्रीत बुमराह आणि नितीश रेड्डी यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.
दुसऱ्या डावात ४० धावांची आघाडी घेऊन फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाला चांगली सुरुवात केली होती. केएल राहुल आणि यशस्वी जैस्वाल यांनी पहिल्या विकेटसाठी ४२ धावांची भागीदारी केली. स्कॉट बोलँडने ही भागीदारी तोडली. त्याने ८व्या षटकात केएल राहुलला बोल्ड केले. राहुलने २० चेंडूत १३ धावा केल्या. १०व्या षटकात बोलंडने यशस्वी जैस्वालला बोल्ड केले. यशस्वीने ३५ चेंडूत २२ धावांची खेळी खेळली.
फलंदाजीला आलेला विराट कोहली पुन्हा एकदा अपयशी ठरला. बोलंडने विराटला स्मिथकरवी झेलबाद केले. विराटने १२ चेंडूत ६ धावांची खेळी खेळली. शुभमन गिलने १५ चेंडूत केवळ १३ धावा केल्या. यानंतर ऋषभ पंतची गडबड पाहायला मिळाली. पंतने पहिले २९ चेंडूत अर्धशतक ठोकले. पंतने ३३ चेंडूत ६१ धावांची खेळी खेळली. यादरम्यान त्याने ६ चौकार आणि ४ षटकार मारले.