सातारा : वेगवेगळ्या अपघातांमधील दोन जखमींचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 1 रोजी फॉरेस्ट कॉलनी, गोडोली येथे अपघातात जखमी झालेल्या मयूर मनोज कुलकर्णी रा. सदाशिवनगर, ता. सातारा यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार चव्हाण करीत आहेत.
दुसऱ्या घटनेत, दि. 5 रोजी दुपारी साडेचार च्या दरम्यान कनिष्क मंगल कार्यालय परिसरात घडलेल्या दुचाकी अपघातातील प्रथमेश विनायक कदम रा. सदर बाजार, सातारा या जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार यादव करीत आहेत.