सातारा : सातारा जिल्ह्यातील भगिणींसाठी आजचा दिवस हा आनंदाचा आहे. राखी पौर्णिमा अगोदर हा ओवाळणीचा कार्यक्रम होत आहे. आपल्या भावांनी पाच दिवस अगोदरच ओवाळणी दिली आहे. उर्वरीत एक ऑगस्टपासूनच्या अर्जांवर सोमवारपासून स्क्रूटीनी कमिटी बसणार आहे. त्यामुळे त्यांचेही पैसे येण्याचा मार्ग सुलभ होणार आहे. दरम्यान, बँक खाते आधारशी तत्काळ लिंक करावे, असे आवाहन महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी पत्रकार परिषदेत केले.
यावेळी वाई-खंडाळा विधानसभेचे आमदार मकरंद पाटील, राष्ट्रवादी सेवा दलाचे राजेंद्र लवंगारे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा सरचिटणीस निवास शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती संघटक स्मिता देशमुख यांची उपस्थिती होती.
आदिती तटकरे म्हणाल्या, साधारणपणे पहिल्या टप्प्यातली फॉर्म भरण्याची मुदत दि. १ जुलै ते ३१ ऑगस्ट आहे. या योजनेसाठी १४ तारखेपासून लाभ देणे सुरु झाले आहे. दि.१ ते ३१ जुलै पर्यंत ज्या लाभार्थ्यांनी अर्ज भरले, त्यांचे फॉर्मस साधारणपणे जुलै महिन्यातले जे आमच्याकडे प्राप्त झाले ते १ कोटी ४0 लक्ष पेक्षा जास्त आहेत. त्यामुळे त्या फॉर्मची स्क्रूटीनी करणे, त्या सगळ्या बाबी तपासणी करणे, नवीन अकाऊंट ओपन करणे, बऱ्याचशा तीस ते पस्तीस टक्के महिलांचे स्वतंत्र अकाऊंटच नव्हते. ते ओपन करुन घेतले आहेत. सातारा जिल्ह्यातून साधारणपणे अर्ज ५ लाख २१ हजार १३१ आहेत. त्यापैकी ऑनलाईन ५ लाख १२ हजार ८00 आहेत. यामध्ये ९८ टक्के अर्ज एप्रूव्ह केले. ज्यांनी जुलै आणि ऑगस्ट नोंदणी केली, त्यांना पैसे वितरीत केल्याचे त्यांनी सांगितले.
१ ऑगस्टपासून आलेल्या अर्जाची स्कूटीनी सोमवारपासून करत आहे. अनेकांचे बँक खाते आधारशी लिंकच नाही. त्यामुळे त्यांनी ते तत्काळ करुन घ्यावेत. साधारणपणे १ कोटी ३४ लक्ष जे परिपूर्ण अर्ज होते. त्यापैकी २५ ते २६ लाख अर्ज आधारशी लिंक नाहीत. पण ते पात्र लाभार्थी आहेत. त्यामुळे बँक आधार लिंक झाला की त्यांनाही जुलै, ऑगस्ट महिन्याचा लाभ हा मिळणारच आहे. याबाबत आम्ही स्थानिक प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. साधारणपणे येत्या दोन-तीन दिवसांत राज्यातील चार ते पाच लाख अकौंटस आहेत, ते मार्गी लावणार आहोत.
दंड आकारण्या संदर्भात जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधला असून संबंधित बँकेचे प्रशासन यांच्याबरोबर बैठक आयोजित करुन या मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळाला आहे, त्यामध्ये कोणतीही कपात करु नये, ज्या महिलांचे खाते गेल्या दोन तीन वर्षातील झिरो बॅलन्सचे आहे, त्यांनाच दंड आकारण्यात आल्याचे दिसत आहे. नव्याने खाते उघडले आहे, त्यांच्या बँक खात्यातून कोणतीही आकारणी झाली नाही.
बहिणीच्या योजनेसाठी बँक खाते आधारशी लिंक करा
महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांचे आवाहन
by Team Satara Today | published on : 18 August 2024

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा