उन्हाळाच्या दिवसांमध्ये शरीरात अनेक बदल होऊ लागतात. कारण या दिवसांमध्ये शरीरात वाढलेल्या उष्णतेचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. पचनक्रिया बिघडणे, कामाचा वाढलेला तणाव, जंक फूडचे अतिसेवन, अपुरी झोप इत्यादी अनेक गोष्टींमुळे शरीराचे नुकसान होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे वाढत्या उन्हाळ्यात रोजच्या आहारात संत्र्याच्या रसाचे नियमित सेवन करावे. कारण यामध्ये असलेले विटामिन सी आणि इतर पोषक घटक आरोग्यासह शरीरासाठी सुद्धा अतिशय महत्वाचे ठरतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला महिनाभर नियमित संत्र्याच्या रसाचे सेवन केल्यामुळे आरोग्याला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
उन्हाळ्यात सतत येणाऱ्या घामामुळे संपूर्ण शरीर डिहायड्रेट होऊन जाते. डिहायड्रेशनच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी नियमित संत्र्याच्या रसाचे सेवन करावे. या रसाच्या सेवनामुळे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होणार नाही.
विटामिन सी युक्त पेयांचे नियमित सेवन केल्यास शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारते आणि आरोग्याला अनेक फायदे होतात. साथीच्या आजारांपासून शरीराचा बचाव करण्यासाठी संत्र्याचा रस प्यावा.
शरीराची कमी झालेली ऊर्जा वाढवण्यासाठी आहारात नियमित संत्र्याच्या रसाचे सेवन करावे. या रसामध्ये असलेले गुणधर्म शरीराची ऊर्जा वाढवण्यासाठी मदत करतात.
संत्र्याच्या रसात पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणावर आढळून येते.त्यामुळे नियमित संत्र्याचा रस प्यायल्यास शरीराचा रक्तदाब नियंत्रणात राहील.
पोट किंवा पचनासंबंधित समस्या उद्भवू लागल्यानंतर संत्र्याचा रस प्यावा. या रसाचे सेवन केल्यामुळे अन्नपदार्थ सहज पचन होतात आणि अपचन किंवा गॅसची कोणतीही समस्या उद्भवत नाही.