सातारा : बेकायदेशीररीत्या धारदार शस्त्रे आणि लोखंडी गजांची वाहतूक करणार्या एका व्यक्तीला बोरगाव पोलिसांनी अटक केली. या कारवाईत विना क्रमांकाची कार, कोयता आणि लोखंडी गज असा सुमारे साडेतीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 7 रोजी रात्री समर्थ गाव परिसरातील डी. पी. जैन कंपनीच्या रस्त्यावर पोलिसांनी संशयित कारची तपासणी केली. त्यावेळी विक्रम अधिकराव यादव (वय 33, रा. अतीत, ता. सातारा) याच्या ताब्यातील हुंडाई आय-20 कारमधून 12 मिमीचे 16 लोखंडी गज आणि एक कोयता आढळून आला.
पोलीस कॉन्स्टेबल केतन जाधव यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.