सातारा : विनयभंग प्रकरणी एका विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 10 रोजी रात्रीच्या सुमारास सातारा शहरातील एका महिलेसमोर असभ्य वर्तन केल्याप्रकरणी प्रवीण सुतार रा. संगम माहुली, ता. सातारा यांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार बोराटे करीत आहेत.