साताऱ्यात जुना मोटर स्टँड भाजी मंडईत मद्यप्राशन करून आरडाओरडा करणाऱ्यावर गुन्हा

by Team Satara Today | published on : 16 May 2026


सातारा : शहरातील जुना मोटर स्टँड परिसरातील भाजी मंडईत मोठमोठ्याने आरडाओरडा करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शाहूपुरी पोलीस ठाणे हद्दीत करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १५ रोजी सायंकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास अनिल कोळी हा भाजी मंडई परिसरात आरडाओरडा करीत असताना आढळून आला. त्याच्या वर्तनावरून तो मद्यप्राशन केलेल्या अवस्थेत असल्याचा संशय आल्याने त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ८५(१) अन्वये सरकारतर्फे फिर्याद दाखल करण्यात आली.

या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल विशाल धुमाळ यांनी फिर्याद दिली असून अनिल युवराज कोळी (वय ४१, रा. आकाशवाणी झोपडपट्टी, सातारा) याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार पोळ करीत असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कुरवली खुर्द येथे सुनेच्या तोंडात तणनाशक ओतून जीवे मारण्याचा प्रयत्न; पती व सासू विरोधात गुन्हा
पुढील बातमी
हद्दपार आदेशाचा भंग केल्याप्रकरणी युवकाविरुद्ध शाहूपुरी पोलिसांत गुन्हा

संबंधित बातम्या