सातारा : माहे सप्टेंबर 2026 मधील महिला लोकशाही दिन सोमवार दि. 21 सप्टेंबर 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, नियोजन भवन, सातारा येथे आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी शिल्पा पाटील यांनी दिली. जिल्हास्तर लोकशाही दिनामध्ये अर्ज करणाऱ्या महिलांनी जिल्हास्तरीय महिला लेाकशाही दिनाकरीता करावयाचा विहित नमुन्यातील अर्ज संबंधितानी 15 दिवस अगोदर पाठवणे आवश्यक असून लोकशाही दिनादिवशी मूळ अर्ज व अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रासह महिला लोकशाही दिनास उपस्थित राहणे आवश्यक आहे.
सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी महिला लोकशाही दिनाचे आयोजन
by Team Satara Today | published on : 20 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा