सातारा : हद्दपारच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आकाश उर्फ गुंड्या ज्ञानेश्वर कापले (वय ३०, रा. दत्तनगर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याची फिर्याद कॉन्स्टेबल तुषार भोसले यांनी शहर पोलिसांत दिली आहे,याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी,कोडोली येथील दत्तनगर कॅनॉलचे शेजारी पत्र्याच्या शेडच्या आडोशाला आकाश कापले हा पोलिसांना आढळून आला, त्याला सातारा जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता हद्दपार केले असताना त्याने हद्दपार प्राधिकरणाची कोणतीही लेखी परवानगी न घेता आढळून आला, आदेशाचा भंग केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, याबाबतचा तपास पोलीस हवालदार कडव करत आहेत.