सातारा : प्रवासादरम्यान अज्ञाताने सुमारे 43 हजारांचा मुद्देमाल चोरल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कोल्हापूर ते सातारा प्रवासावेळी अज्ञाताने एसटीतून 42 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला. याप्रकरणी स्मिता सुकुमार जंगटे (रा.कागल जि.कोल्हापूर) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना दि. 7 जुलै रोजी घडली आहे. चोरट्यांनी सोन्याचे वेढणे, सोन्याची चमकी, घड्याळ, बॅग, महत्वाची कागदपत्रे असा मुद्देमाल चोरला आहे.