वडूज येथे ‘अमृत फॅशन डिझायनिंग कोर्स सुरु; प्रशिक्षण बॅचचे उद्घाटन

by Team Satara Today | published on : 12 February 2026


सातारा  : अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा आर्थिक दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी विविध प्रकारचे प्रशिक्षण कार्यक्रम राबवते. या संस्थेमार्फत वडूज (ता. खटाव) येथे महिला व युवतींसाठी फॅशन डिझायनिंग कौशल्य प्रशिक्षणाचा नुकताच प्रारंभ करण्यात आला. या प्रशिक्षण बॅचचे उद्घाटन अमृत संस्थेचे विभागीय व्यवस्थापक प्रथमेश कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी अमृत संस्थेचे सातारा जिल्हा व्यवस्थापक मनोज मिरासदार आणि विनायक पाठक उपस्थित होते. 

विभागीय व्यवस्थापक श्री. कुलकर्णी यांनी सांगितले, की 'खुल्या प्रवर्गातील महिलांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेऊन स्वतःचे उद्योग सुरू करावेत. शासन त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्यास कटिबद्ध आहे. या बॅचमध्ये महिलांना आधुनिक फॅशन डिझायनिंग, कटिंग आणि शिवणकामाचे मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच यशस्वी प्रशिक्षणार्थ्यांना शासनाचे प्रमाणपत्र मिळेल. त्याचा उपयोग बँकेचे कर्ज मिळण्यासाठी होईल. त्यामुळे त्यांना यशस्वी उद्योजक बनण्यास मदत होईल. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ https://mahaamrut.org.in ला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
स्व. क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात जागतिक युनानी दिन उत्साहात संपन्न
पुढील बातमी
महात्मा बसवेश्वर सामाजिक समता शिव व क्रांतीवीर राजे उमाजी नाईक पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

संबंधित बातम्या