पेट्रोल पंपासमोरून ट्रकची चोरी

by Team Satara Today | published on : 18 April 2025


सातारा : लोणंद, ता. खंडाळा येथील एका पेट्रोल पंपाच्या समोरून ट्रकची चोरी करण्यात आली. याप्रकरणी लोणंद पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी कमल चिंतामणी शिंदे (रा. तरडगाव, ता. फलटण) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार दि. १६ एप्रिल रोजी हा प्रकार घडला आहे. लोणंद येथील एका पेट्रोल पंपासमोर ट्रक (एमएच, ०६. एक्यू, ७९४६) उभा करण्यात आलेला होता. त्यावेळी अज्ञाताने ट्रक चोरून नेला. ट्रकची किंमत सुमारे १५ लाख रुपये होती. ट्रकची चोरी झाल्याचे दिसून आल्यानंतर पोलिसांत तक्रार देण्यात आली. लोणंद पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात वाहन चोरीचा गुन्हा नोंद केला आहे. तसेच पोलिसांनी चोरट्याचा शोध सुरू केला आहे.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
शेते येथे एकाची आत्महत्या
पुढील बातमी
 ‘दाभोळकर हत्या आणि मी’ पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

संबंधित बातम्या