07:58pm | Sep 03, 2024 |
सातारा : ठोसेघर धबधबा कास प्रमाणेच पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू राहिला आहे. त्यातून आता पाऊस कमी झाल्याने पर्यटकांचा ओघ ठोसेघर धबधबा पाहण्यासाठी रोजच वाढताना दिसत आहे. वर्षा सहलीसाठी राज्यासह देश-विदेशातील पर्यटक पर्यटनासाठी ठोसेघरला पसंती देत आहेत.
सातारा जिल्ह्याला नैसर्गिक साधनसंपत्तीचे विपुल वरदान लाभले आहे. ठोसेघरचा धबधबा, कास पुष्प पठार, वजराई धबधबा, सडा वाघापूरचा उलटा धबधबा अशी अनेकविध पर्यटनस्थळे पर्यटनासाठी पर्यटकांना साद घालत असतात. याठिकाणी राज्यासह देश-विदेशातून मोठ्या प्रमाणावर पर्यटक आपली हजेरी लावून हे निसर्गाचे चमत्कार आपल्या डोळ्यांसह कॅमेर्यात कैद करीत असतात.
काही दिवसांपूर्वी मुसळधार पावसाने सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात जोर धरल्याने जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने काही दिवस ठोसेघर धबधबा पर्यटनासाठी बंद होता. मात्र त्यानंतर हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची मांदियाळी होत आहे. वर्षा सहल, ग्रुप ट्रीप तसेच कौटुंबिक व मित्र परिवारासह हजारो पर्यटक रोजच्या रोज ठोसेघर धबधबा पाहण्यासाठी येत आहेत.
अबालवृद्ध पर्यटकांची सेल्फीची आवड लक्षात घेवून याठिकाणी उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज यांच्या संकल्पनेतून सेल्फी पॉईंट उभारण्यात आला असून त्याचा आनंद न विसरता पर्यटक घेताना दिसत आहेत. तसेच प्री-वेडिंग शूटसाठीही ठोसेघरला प्रथम पसंती मिळत आहे. त्यातच कास पुष्प पठाराप्रमाणेच विविध प्रजातींची फुले याठिकाणी उमलत असल्याने हेही पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले आहे. वर्षा सहलीत रिमझिम पावसात भिजत ठोसेघर धबधब्याचे मनोहारी दृश्य आपल्या कॅमेर्यात कैद करीत पर्यटक पुन्हा पुन्हा ठोसेघरलाच प्राधान्य देत आहेत.
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी समिती
ठोसेघर धबधबा पाहण्यासाठी येणार्या पर्यटकांना कोणत्याही प्रकारची असुविधा होवू नये, यासाठी संयुक्त वनव्यवस्थापन समिती, ठोसेघर यांनी धबधबा परिसरात प्रसाधनगृह, महिलांना कपडे बदलण्यासाठी वेगळी खोली, वृद्धांना विश्रामासाठी आणि पर्यटकांना ठोसेघरची माहिती व्हावी यासाठी चलचित्र सुरु असलेला मोठा हॉल, सिक्युरिटी गार्डस आदींची उत्तमरित्या सोय केली आहे. पर्यटकांच्या सोयीकडे समितीचे अध्यक्ष शंकरअप्पा चव्हाण आणि व्यवस्थापक प्रवीण चव्हाण यांची टीम जातीने लक्ष देत असल्याने पर्यटक याठिकाणी येवून समाधानी झाल्याचे चित्र दिसत आहे.
हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा |
कराड परिसरातील 92 गुन्हेगार हद्दपार |
सातारा तालुक्यातून १२ इसम हद्दपार |
तडीपार सराईत दुचाकी चोरटा जेरबंद |
लिंगायत समाज हिंदू धर्माचा अविभाज्य घटक : खासदार अजित गोपछडे |
साहेबराव पवार यांचे विचार मार्गदर्शक : पृथ्वीराज चव्हाण |
शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
सातारा शहरातून दोन दुचाकींची चोरी |
आदेशाचा भंग केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
राहत्या घरातून एकजण बेपत्ता |
हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा |
सणांच्या पार्श्वभूमीवर 14 गुन्हेगार फलटण ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतून तात्पुरते हद्दपार |
आरोग्य योजनेत गैरप्रकार करणार्या हॉस्पिटलला धडा शिकवणार |
साहेबराव पवार यांचे विचार मार्गदर्शक : पृथ्वीराज चव्हाण |
शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
सातारा शहरातून दोन दुचाकींची चोरी |
आदेशाचा भंग केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
राहत्या घरातून एकजण बेपत्ता |
हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा |
सणांच्या पार्श्वभूमीवर 14 गुन्हेगार फलटण ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतून तात्पुरते हद्दपार |
आरोग्य योजनेत गैरप्रकार करणार्या हॉस्पिटलला धडा शिकवणार |
गॅलेक्सी संस्थेच्या कार्यक्षेत्र विस्तारास परवानगी |
सावलीत उद्या खेळ पैठणीचा कार्यक्रम |
कष्टकरी-उपेक्षितांच्या चळवळीसाठी डी. व्ही. पाटील यांचे योगदान मोलाचे |
झेडपीसमोर रस्त्यासाठी उपोषण |
शिर्डीत जुनी पेन्शन संघटनेचे १५ रोजी पेन्शन महाअधिवेशन |