सातारा : घरासमोर पार्क केलेल्या ओमनी कार मधील सुमारे 17 हजारांचा माल लंपास केल्याप्रकरणी अज्ञातावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, विष्णूकुमार रामपाल मंत्री रा. गुरुदत्त कॉलनी एमआयडीसी सातारा यांचा इलेक्ट्रिकल साहित्य विकण्याचा व्यवसाय आहे. त्यांनी दि. 20 जुलै रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास घरासमोर त्यांची ओमनी कार क्रमांक एमएच 11 बी 116 पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी रात्री गाडीची काच फोडून गाडीमध्ये ठेवलेले वॉटर हीटर चे 36 बॉक्स आणि इस्त्रीचे दहा नग असा एकूण 17 हजार 220 रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला आहे. अधिक तपास महिला पोलीस नाईक शिंदे करीत आहेत.
अज्ञातांनी केला ओमनी कार मधील 17 हजारांचा माल लंपास
by Team Satara Today | published on : 22 July 2023
 
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे  मोबाईल ॲप डाऊनलोड करा
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
