सातारा : युवतीला बेदम मारहाण करत पेट्रोलची बाटली दाखवून जिवंत मारण्याची धमकी देवून विनयभंग केल्याप्रकरणी वैभव ज्ञानदेव सावंत (वय 40, रा. चतुरबेट लिंब ता.सातारा) याच्या विरुध्द सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ही घटना दि. 28 सप्टेबर रोजी घडली आहे. युवतीला संशयिताने गवतामध्ये ओढून घेत तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. युवतीने प्रतिकार केल्यानंतर जाळून टाकण्याची धमकी तिला दिली. तरीही युवतीने प्रतिकार केल्यानंतर ओढणीने तिचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला. युवती प्रतिकार करत असल्याचे पाहून संशयिताने तेथून पलायन केले. घडलेल्या घटनेची माहिती युवतीने कुटु्ंबियांना दिल्यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली.