चिंचणीत घरफोडी; सुमारे 2 लाख 20 हजार रुपयांचा ऐवज लंपास

by Team Satara Today | published on : 09 October 2026


सातारा : चिंचणी, ता. सातारा येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करुन सुमारे 2 लाख 20 हजारांचा लंपास केल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, चिंचणी (ता. सातारा) येथे घराचे कुलूप काढून चोरट्याने सुमारे 2 लाख 20 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरले. विमल ज्ञानेश्वर सावंत यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चोरट्याने 50 हजार रुपये किमतीचे कानातील टॉप आणि 1 लाख 70 हजार रुपयांचे गंठण लंपास केले. महिला कर्मचारी कुंभार तपास करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
खण आळीत रस्त्याचा श्वास मोकळा करण्यासाठी पालिकेची मोहीम ! नऊ मीटरचा रस्ता अतिक्रमणांनी अरुंद; व्यापाऱ्यांना सात दिवसांच्या मुदतीनंतर कारवाईचा इशारा
पुढील बातमी
सदरबझार परिसरात जुन्या वादातून तरुणाला मारहाण; एकाविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा

संबंधित बातम्या