सातारा : दुचाकी अपघातात एकास जखमी केल्याप्रकरणी दुसर्याविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सैदापूर ता.सातारा गावच्या हद्दीत दोन दुचाकींच्या झालेल्या अपघात प्रकरणी रोहित घाडगे (रा.सातारा) याच्या विरुध्द सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी रफिक इस्माईल शिकलगार (वय 62, रा. सैदापूर) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. अपघातात शिकलगार हे जखमी झाले आहेत.