मधुसूर आंतरशालेय सुगम संगीत स्पर्धेचे आज आयोजन

by Team Satara Today | published on : 23 August 2024


सातारा : स्वर्गीय नानासाहेब द्रविड यांच्या स्मणार्थ मधुसुर राज्यस्तरीय आंतरशालेय सुगम संगीत स्पर्धेचे शनिवार दिनांक 24 ऑगस्ट रोजी शाहू कला मंदिर येथे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती स्पर्धा संयोजक एडवोकेट सीए राजगोपाल द्रविड व एडवोकेट अमित द्रविड यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
या स्पर्धेचे उद्घाटन सकाळी नऊ वाजता खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते होणार आहे. बक्षीस समारंभ त्याच दिवशी सायंकाळी पाच वाजता अभिनेते विजय निकम आणि सातारा जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष एडवोकेट विकास पाटील मेहकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या कार्यक्रमाचा सर्वसाधारकांनी लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पीडित महिलांच्या सुरक्षेसाठी जिल्ह्यात स्वतंत्र भरोसा सेल
पुढील बातमी
तडीपार सराईत गुंडाला चारभिंती परिसरात पकडले

संबंधित बातम्या