सातारा : भिमाबाई आंबेडकर समता प्रतिष्ठानतर्फे गुरुवार दि. १० रोजी धम्मसंगिनी अर्थात, धम्मपरिषदेचे आयोजन येथील संत गाडगे महाराज सामाजिक संस्था सांस्कृतिक भवन कामाठीपुरा,गोडोली येथे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष पार्थ पोळके यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले आहे.
सकाळी १०।। वाजता ह.भ.प.ज्ञानेश्वर बंडगर (पंढरपूर) यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. दुपारी १२ वा.पहिल्या सत्रात, "बाबासाहेबांचे धर्मान्तर/नवयान" या विषयावर डॉ.प्रदीप गोखले (पुणे) यांचे व्याख्यान होणार आहे.दुसऱ्या सत्रात एक वाजता,"आम्रपालीचे धर्मान्तर" या विषयावर धम्मसंगिनी रमा गोरख (नागपूर) यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.तिसऱ्या सत्रात अडीच वाजता रवींद्र इंगळे चावरेकर (बुलढाणा) यांचे, "बुद्धाच्या वैदिकीकरणाचे स्वरूप आणि परिणाम" या विषयावर मार्गदर्शन होणार आहे.चौथ्या सत्रात साडे तीन वाजता समारोपाचे मार्गदर्शन बंधुत्व पुरस्कार विजेते डॉ.श्रीमंत कोकाटे यांचे,"वैदिक धर्माचे आक्रमण" या विषयावर समारोपाचे मार्गदर्शन होणार आहे. तेव्हा उपासक व उपासीकेनी लाभ घ्यावा. असे आवाहन संयोजकांनी केले आहे.