सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पुर्व प्रशिक्षणासाठी मोफत सुवर्णसंधी

by Team Satara Today | published on : 23 May 2025


सातारा : भारतीय सैन्यदल,नौदल,व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड (एसएसबी) या परीक्षेची पुर्वतयारी करुन घेण्यासाठी छात्रपुर्व प्रशिक्षण केंद्र नाशिक रोड नाशिक येथे महाराष्ट्र शासणातर्फे महाराष्ट्रातील नवयुवक व नवयुवतींसाठी १६ जुन ते २९ऑगस्ट २०२५  या कालावधीत सीडीएस कोर्स क्रं.६५ चे आयोजन करण्यात येत आहे.या कालावधीत प्रशिक्षणार्थीना नि:शुल्क प्रशिक्षण,निवास व भोजन दिले जाते.

तरी सातारा जिल्हयातील इच्छुक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी होण्याची सुवर्णसंधी उपभोगण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात दिनांक २ जुन २०२५ रोजी मुलाखतीस हजर राहावे.मुलाखतीस येताना  त्यांनी डिपार्टमेंट ऑफ सैनिक वेलफेयर पुणे डिएसडब्ल्यु यांच्या साईडवर सर्च करुन त्यामधील सीडीएस -६५ कोर्ससाठी किंवा जिल्हा सैनिक कार्यालयाने प्रिंट दिलेले प्रवेशपत्र व सोबत असलेली परिशिष्ठांची प्रिंट घेवुन व ते पुर्ण भरुन सोबत घेवुन यावे.

सदर सी.डी.एस. वर्गामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी खाली नमुद कोणतीही एक पात्रता असणे आवश्यक आहे.व त्या संबधीचे प्रमाणपत्र प्रशिक्षण वर्गाला येताना सोबत घेवुन यावे.

उमेदवार हा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा.तसेच लोकसंघ आयोग नवी दिल्ली यांचे मार्फत घेण्यात येणाऱ्या सीडीएस परीक्षेकरीता ऑनलाईन अर्ज केलेला असावा .अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी,छात्रपुर्व प्रशिक्षण केंद्रं ,नाशिक रोड,नाशिक यांचा ईमेल आयडी: trainingpctcnashik@gmailcom व दुरध्वनी क्रं. ०२५३-२४५१०३२ किंवा व्हाट्सअप् क्रमांक ९१५६०७३३०६ वर कार्यालयीन वेळेत सपंर्क साधावा असे आवाहन ले.कर्नल हंगे स.दै.निवृत्त,जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी,सातारा यांनी केले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
परळी-ठोसेघर मार्गावरील दरड कोसळली
पुढील बातमी
नूतन पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांनी स्वीकारला पदभार

संबंधित बातम्या