सातारा : अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी दोनजणांवर कारवाई करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सदरबझारमधील लक्ष्मी टेकडी येथे विनोद विठ्ठल भांडवलकर (रा. लक्ष्मी टेकडी) हे दि. 28 रोजी अवैधरीत्या दारु विक्री करताना सापडले. पोलीस कॉन्स्टेबल संतोष घाडगे यांनी कारवाई केली असून, सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहेत.
दुसर्या प्रकरणात, पानमळेवाडी, ता. सातारा येथे रतन रामचंद्र जाधव (वय 60, रा. पानमळेवाडी) हे दि. 28 रोजी हे अवैधरीत्या दारुविक्री करताना आढळून आले. त्याच्यावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.