पुणे : पुण्यातील खराडीमध्ये शरद पवार यांची सभा झाली. या सभेत बोलताना शरद पवार यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे यांच्यावर सडकून टीका केली. पवारांनी सुनील टिंगरे यांचा ‘दिवटा’ असा उल्लेख केला. तसंच पोर्शे कार अपघात प्रकरणाचा दाखलाही शरद पवार यांनी या भाषणात दिला. त्यांच्या या टीकेनंतर सुनील टिंगरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवारांच्या या टीकेवर सुनील टिंगरे यांनी उत्तर दिलं. शरद पवार माझ्यासाठी कालही आदरणीय होते, आज ही आहेत आणि उद्याही राहतील. त्यांना माझा कान पकडायचा अधिकार आहे. मी त्यांना प्रत्युत्तर देणं योग्य नाही. मला ते शोभत नाही, असं सुनील टिंगरे म्हणालेत.
पुण्यातील माजी आमदार बापूसाहेब पठारे यांनी भाजपला रामराम करत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. या पक्षप्रवेशावेळी शरद पवारांनी केलेल्या भाषणात त्यांनी सुनील टिंगरे यांच्यावर टीका केली.
खराडीमध्ये झालेल्या सभेत शरद पवार यांनी वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील टिंगरे यांच्यावर जोरदार टीका केली. रांजणगावला गेल्यावर जसं गणपतीचं दर्शन होतं. तसं उद्योगांचंही दर्शन होतं. पुण्यात आज ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांनी काय केलं? पुण्याची चौकशी केली तर लोक काय सांगतात? कोयता गँग…., असं शरद पवार म्हणाले.
अलीकडची पिढी काय खाते माहिती नाही. कसल्या तरी गोळ्या खातात. त्या गोळ्या खाल्ल्या की चंद्रावर जातात. सत्ताधारी काय करतात? हा प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. आमचे आमदार दमदार आमदार…. हा आमदार दमदार आहे? त्याचं नाव काय टिंगरे…. तो कुणाच्या तिकिटावर निवडून आला? त्यावेळी पक्षाचा नेता कोण होता? पक्षाची स्थापना कोणी केली? तुझा काय बंदोबस्त करायचा हे लोक करतील. चुकीच्या गोष्टींना पाठिंबा देवू नकोस. एका बिल्डराच्या मुलाने भरधाव गाडी चालवत दोन मुलांना उडवलं. अशा वेळी हा दिवटा आमदार पोलीस स्टेशनला जातो. याच्यासाठी मते मागितली का? शरद पवारच्या नावाने मते मागितली, श्रद्धेने मते दिली. त्याचं तुम्ही असं उत्तर दायित्व केलं?, असं म्हणत शरद पवार यांनी सुनील टिंगरे यांचे कान धरले. पवारांच्या या टीकेला आता टिंगरेंनीही उत्तर दिलं आहे.
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
दुचाकीला कुत्रे आडवे आल्याने एकाचा मृत्यू |
जीवन प्राधिकरण कर्मचार्यांचे वेतन आयोगासाठी आंदोलन |
कॉंग्रेस पक्ष वाढीसह विधानसभेला हवे सुक्ष्म नियोजन |
वंचित आघाडीच्या वतीने 58 उमेदवारांच्या मुलाखती |
कॉंग्रेस पदाधिकार्याच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे |
लहुजी शक्ती सेनेची जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने |
उपसा जलसिंचन योजनांच्या ३३६६ कोटींच्या सौर ऊर्जीकरणास सुरुवात |
कंत्राटी 83 पात्र उमेदवारांची ग्रामसेवकपदी नियुक्ती |
झेडपीच्या ठराव समिती सभेत विविध विषयांवर चर्चा |
मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा |
सातारा शहरासह तालुक्यातील आठ जुगार अड्ड्यांवर छापे |
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
भरधाव कारच्या धडकेत शाळकरी मुलगी ठार |
फलटणची कुरेशी टोळी जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार |
कॉंग्रेस पदाधिकार्याच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे |
लहुजी शक्ती सेनेची जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने |
उपसा जलसिंचन योजनांच्या ३३६६ कोटींच्या सौर ऊर्जीकरणास सुरुवात |
कंत्राटी 83 पात्र उमेदवारांची ग्रामसेवकपदी नियुक्ती |
झेडपीच्या ठराव समिती सभेत विविध विषयांवर चर्चा |
मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा |
सातारा शहरासह तालुक्यातील आठ जुगार अड्ड्यांवर छापे |
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
भरधाव कारच्या धडकेत शाळकरी मुलगी ठार |
फलटणची कुरेशी टोळी जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार |
झेडपीच्या आरोग्य विभागात 243 जणांना नियुक्ती |
उद्या शासकीय विश्रामगृहामध्ये होणार 'वंचित' च्या मुलाखती |
राजधानी रास दांडियाचे उदंड महिलांच्या प्रतिसादात उद्घाटन |
राज्य नाट्य स्पर्धेचे केंद्र सातारा जिल्ह्यात |
खोटं बोलणार्या कॉंग्रेसला मतदारांनी हरवलं : विकास गोसावी |