सातारा : शहर परिसरात सार्वजनिक ठिकाणी आरडाओरडा करुन सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी पोलिसांनी चौघांवर गुन्हे दाखल केले आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, विनोद भिमा शिंदे (वय 36, रा. सोनगाव ता.सातारा) याच्या विरुद्ध शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
दुसरी कारवाई सिध्दार्थ राजेंद्र साळुंखे (वय 23, रा. मंगळवार पेठ, सातारा) याच्यावर करण्यात आली आहे. तिसरी कारवाई ओंकार बबन सुर्वे (वय 27, रा. बोगदा परिसर) याच्या विरुद्ध करण्यात आली आहे.
चौथी कारवाई मनोज गंगाराम मेळाट (वय 36, रा. मंगळवार पेठ, सातारा) याच्यावर करण्यात आली आहेत. दि. 27 मे रोजी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. शाहूपुरी पोलीस ठाण्यात हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.