सातारा : जिल्हा प्रकल्प अंमलबजावणी कक्ष सातारा अतंर्गत सातारा जिल्हयाचे खरेदीदार विक्रेता संमेलन सुतगिरणीच्या मागे, पाठेश्वर डोंगराकडे अजिक्यंतारा साखर कारखाना लि. शेंद्रे येथे संपन्न झाले. या संमेलनामध्ये स्मार्ट प्रकल्पाअंतर्गत सातारा जिल्हयातील मान्यताप्राप्त एकोणीस व अन्य चौदा समुदाय आधारित संस्थानी भाग घेतला.
यावेळी बसवराज मास्तोळी विभागीय कृषी सहसंचालक कोल्हापूर विभाग कोल्हापूर, यांनी खरेदीदार व विक्रेत्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्तावीक अजय शेंडे प्रमुख् जिल्हा अमंलबजावणी कक्ष स्मार्ट प्रकल्प तथा प्रकल्प संचालक आत्मा यांनी केले.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
