साताऱ्यात भाजप उमेदवारांचा प्रचार केल्याने एकाला 20 जणांनी मारहाण केली

by Team Satara Today | published on : 05 December 2025


सातारा :  भाजप पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार केल्याच्या कारणावरुन एकाला 20 जणांनी मारहाण केली आहे. यातील सहा जणांवर गुन्हे दाखल झाले असून इतरांचा शोध सुरु आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मंगळवार दि. 2 रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास गोडोली येथील भैरोबा मंदिराकडे जाणा-या रस्त्यावर मोहित संदेश खुरपे (वय 26, रा. गोळीबार मैदान गोडोली सातारा) याला भाजप पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करतो म्हणून 20 जणांनी मारहाण केली. यातील अक्षय शिवाजी मोरे, अजय पार्टे, शंकर मोरे, आण्णा मोरे, ओमकार डोंगरे, केदार ढाणे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. इतर संशयितांचा शोध सुरु आहे. अधिक तपास पोलीस हवालदार जाधव करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
इव्हीएम मशीन गोडाऊनमध्ये डबल डोअर लॉक पद्धतीने सील; मुख्याधिकारी विनोद जळक यांची माहिती, गोडाऊनच्या परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा
पुढील बातमी
इंडिगो एअरलाइन्सची विमानसेवा विस्कळीतच; सलग तिसरा दिवस ; दिवभरात ४२ विमाने रद्द

संबंधित बातम्या