आठवड्यातून एकदा प्रत्येक घरात कढी बनवली जाते. कधी टोमॅटोची कढी बनवली जाते तर कधी कोकम कढी बनवली जाते. घाईगडबडीच्या वेळी झटपट काय बनवावं बऱ्याचदा सुचत नाही. अशावेळी अनेक लोक बाहेरून विकत आणलेले पदार्थ खातात. पण कायमच विकतचे पदार्थ खाण्यापेक्षा घरी सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही कढी बनवू शकता. आज आम्ही तुम्हाला मसाला कढी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ गरमागरम भातासोबत किंवा इतर सर्वच पदार्थांसोबत अतिशय सुंदर लागतो. दह्याची कढी बनवल्यानंतर त्यात बेसन आणि इतर पदार्थ टाकले जातात. ज्यामुळे कढी चव अतिशय सामान्य लागते. पण कढी आणखीनच झणझणीत होण्यासाठी तुम्ही कढीला मसाल्यांचा तडका देऊ शकता. यामुळे कढीची चव आणखीनच वाढेल आणि जेवणात चार घास जास्त जातील. गरमागरम भातासोबत मसाला कढी अतिशय सुंदर लागते. चला तर जाणून घेऊया मसाला कढी बनवण्याची सोपी रेसिपी
साहित्य :
दही
बेसन
मोहरी
जिरं
लसूण
मीठ
कढीपत्ता
मेथी दाणे
आलं लसूण पेस्ट
हिरवी मिरची
लाल तिखट
तिखट मिरची
हिंग
कृती:
मसाला कढी बनवण्यासाठी सर्वप्रथम, वाटीमध्ये दही घेऊन व्यवस्थित फेटून घ्या. त्यानंतर अर्धा किंवा एक चमचा बेसन टाकून पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करा.
मिक्स करताना बेसनमध्ये अजिबात गुठळ्या ठेवू नये. यामुळे कढी व्यवस्थित होत नाही.
टोपात तेल गरम करून घ्या मोहरी, जिरं, हिंग आणि कढीपत्त्याची पाने, मेथी दाणे टाकून मिक्स करा. त्यानंतर त्यात किसलेलं आलं, लसूण घालून फोडणी भाजा.
त्यानंतर त्यात थोडासा कांदा टाकून लाल होईपर्यंत भाजून घ्या. कांदा व्यवस्थित भाजल्यानंतर त्यात तयार केलेले बेसनाचे मिश्रण ओतून आवश्यकतेनुसार पाणी घालून मिक्स करा.
त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ घालून मिक्स करा. कढीला उकळी आल्यानंतर गॅस बंद करून घ्या.
फोडणी तयार करताना फोडणीच्या वाटीमध्ये तेल गरम करून त्यात जिरं, कढीपत्ता आणि लाल घालून फोडणी मिक्स करा आणि तयार केलेल्या कढीमध्ये ओतून व्यवस्थित मिक्स करा.
तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली मसाला कढी. हा पदार्थ सगळ्यांचं खूप जास्त आवडेल.