सातारा : येथील रा. ना. गोडबोले सार्वजनिक ट्रस्टच्या वतीने दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या विद्यार्थी व शैक्षणिक संस्थांच्या करिता शैक्षणिक शिष्यवृत्ती प्रदान करण्याचा कार्यक्रम येत्या रविवारी दि. 9 ऑगस्ट 2026 रोजी सातारा येथील समर्थ सदन सांस्कृतिक केंद्र ,राजवाडा येथे आयोजित करण्यात आला आहे .
सकाळी साडेआठ ते बारा या वेळेत तीन विभागात हा शैक्षणिक शिष्यवृत्ती प्रदान करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. विविध क्षेत्रातील मान्यवर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ही शिष्यवृत्ती प्रदान केली जाणार आहे . ज्या विद्यार्थी, विद्यार्थिनींना तसेच शैक्षणिक संस्था यांना संबंधित शिष्यवृत्ती जाहीर करण्यात आली आहे. त्यांनी या कार्यक्रमास वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन ट्रस्टचे विश्वस्त व माजी नगराध्यक्ष डाॅ. अच्युत गोडबोले यांनी केले आहे.