सातारा : अवैधरित्या दारुविक्री प्रकरणी सातारा तालुका पोलिसांनी दोनजणांवर कारवाई केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातार्यातील दिव्यनगरी येथे पानटपरीच्या आडोशाला बेकायदा दारु विक्री केल्याप्रकरणी ऋषीकेश संपत बर्गे (रा. दिव्यनगरी) याच्या विरुध्द सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी त्याच्याकडून 770 रुपये किंमतीच्या 11 दारुच्या बाटल्या जप्त केल्या आहेत.
दुसर्या घटनेत, लिंब ता.सातारा येथे बेकायदा दारु विक्री केल्याप्रकरणी रुपेश दगडू माने (वय 47, रा.लिंब) याच्या विरुध्द सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही कारवाई 31 जुलै रोजी करण्यात आली आहे. पोलिसांनी संशयिताकडून 980 रुपये किंमतीच्या 14 दारुच्या बाटल्या जप्त केल्या आहेत.