श्री उत्तर चिदंबरम् नटराज मंदिरात 'महाशिवरात्री' निमित्त रुद्र अनुष्ठानाचे आयोजन

सातारा : ..श्री आनंद नटराजा व श्री शिवकामसुंदरी या देवतांच्या कृपेने, तसेच श्री कांचीकामकोटीपीठाचे शंकराचार्य परमपूज्य श्री चंद्रशेखरेंद्र सरस्वती महास्वामी तसेच श्री कांची कामकोटीपीठाचे शंकराचार्य परमपूज्य श्री जयेंद्र सरस्वती व श्री कांचीकामकोटीपीठाचे शंकराचार्य पीठाधिपती परमपूज्य श्री शंकर विजयेंद्र सरस्वती यांचा पूर्णानुग्रह आणि शुभाशिर्वादाने श्री उत्तर चिदंबरम् नटराज मंदिरात 'महाशिवरात्री' निमित्त 'रुद्र व संगीत आणि नृत्यांजली सेवा' संपन्न होणार आहे. या आनंददायी सोहळ्याचे औचित्य साधून लोककल्याणकारक, रोगनिवारक, पापनाशक तसेच सुख, शांती व निरंतर धन धान्य समृद्धि देणाऱ्या अशा "रुद्र अनुष्ठानाचे" आयोजन केले आहे. हा महोत्सव सोमवार दि. १७फेब्रुवारी, २०२५ ते बुधवार दि. २६ फेब्रुवारी २०२५ म्हणजेच महाशिवरात्री पर्यंत श्री नटराज मंदिर, सातारा येथे संपन्न होणार आहे. 

"महाशिवरात्री महोत्सव" निमित्त आयोजित करण्यात आलेल्या सर्व धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होऊन श्री आनंद नटराजा व श्री शिवकामसुंदरी या देवता तसेच परमपूज्य महास्वामिंकडून कृपानुगृहित व्हावे अशी मंदिराचे विश्वस्त आणि महाशिवरात्री महोत्सव सेवा समिती यांच्या वतीने नम्म्र विनंती करण्यात येत आहे.

महाशिवरात्रीनिमित्त आयोजित धार्मिक कार्यक्रमांमध्ये वेदमूर्ती जगदीश शास्त्री भट्ट गुरुजी आणि वेदमूर्ती दत्ताशास्त्री जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवार  दि.24/02/2025 सकाळी 8.00 ते 12.00अनुज्ञा, विघ्नेश्वर पूजा, प्रधान संकल्प, ग्रामदेवता पूजन, स्वस्ति पुण्याहवाचन, नांदी श्राद्ध, होणार असून त्यानंतर दि.25/02/2025 सकाळी मंगळवार 8.00 ते 11.00 गणपती होम, नवग्रह होम, आरती व प्रसाद एकादश कलश स्थापना, लघुरुद्रजप कमार्चना, लघुन्यास व एकादश रुद्र जप, लघुरुद्र होम व पूर्णाहूती, महामंगल आरती. कलशयात्रा, श्री मुलनाथेश्वर पिंडीस कलश महाभिषेक, आधी कार्यक्रम होणार आहेत. दि.26/02/2025 बुधवार सकाळी 8.00 ते 11.00 रात्री अलंकार, नैवेद्य, आरती व प्रसाद, कलश स्थापना, लघुरुद्र जप,8.00 ते 11.00 श्री नटराज पाचू पिंडीस कलशाभिषेक. संपन्न होणार आहे.

नटराज मंदिराच्या वतीने संगीत व नृत्य कार्यक्रम सेवा अंतर्गत संगीत आणि नृत्यांजली सेवा'श्री श्री चंद्रशेखरेंद्र सरस्वती कला मंदिर, येथे   सोमवारदि. 17/02/2025  सायं. 6.00 ते 7.00 सायं. 7.00 ते 8.30 या वेळेत स्थानिक कलाकारांचे भरतनाट्यम सादर होणार आहे,मंगळवार दि. 18/02/2025 सायं. 6.00 ते 8.00 या वेळेत स्थानिक कलाकारांचे भरतनाट्यम सादर होणार आहे .बुधवारदि.19/02/2025 ,सायं. 6.00 ते 8.00'भरतनाट्यम् नृत्यसेवा' गुरु वैशाली पारसनीस यांच्या नृत्यांजली नृत्य संस्था  सातारा.चे शिष्य कलाकार भरतनाट्यम सादर करणार आहेत, गुरुवार दि.20/02/2025  सायं. 6.00 ते 8.00 भरतनाट्यम् नृत्यसेवा'- गुरु सौ. अनुराधा मीनाक्षी व ग्रुप, मुंबई. चे कलाकार भरतनाट्यम सादर करणार आहे .दि.21/02/2025 सायं. 6.00 ते 8.00 शुक्रवार 'कथ्थक नृत्यसेवा' गुरु सौ. नंदिता कुलकर्णी व ग्रुप, सातारा.यांची नृत्यसेवा सादर होणार आहे.शनिवार दि.22/02/2025 सायं. 6.00 ते 08.00 भरतनाट्यम् नृत्यसेवा' गुरु सौ. स्वरदा अनावकर व ग्रुप, पुणे.  यांची नृत्यसेवा सादर होणार आहे.रविवारदि.23/02/2025 सायं. 6.00 ते 8.00 भरतनाट्यम् नृत्यसेवा' गुरु सी. ऋचा आगाशे व ग्रुप  यांची   नृत्य सेवा सादर होणार आहे.सोमवारदि.24/02/2025 सायं. 6.00 ते 8.00 ' भरतनाट्यम्   नृत्यसेवा' गुरु कु. ऋचिरा इंगळे व रुचिन्यास नृत्याभिनय कलागृह, सातारा. यांची नृत्यसेवा सादर होणार आहे. मंगळवार दि. 25 फेब्रुवारी रोजी 6.00 ते 8.00 'गिटार वादन सेवा- गुरु श्री. प्रतीक सदामते ब्लूनोट ग्रुप, सातारा सादर करणार आहेत.बुधवार दि.26/02/26.00 ते 8.00 सकाळी 12.00 ते 1.00 'गायन सेवा कु. वेदांगीनी संदिप कुलकर्णी (राम), पुणे,सायं. 6.00 ते 8.00 'भरतनाट्यम् सेवा' गुरु सौ. आंचल घोरपडे आपली नृत्य सेवा सादर करणार आहे,सायं. 8.00 ते 10.00 नटराज नृत्य कलाशाला ग्रुप, साताराचे कलाकार आपली नृत्य सेवा सादर करणार आहे.

मंगळवार दि. 26/02/2025 या दिवशी महाशिवरात्री निमित्तसकाळी 6.00 ते 1.00 व दु. 3.00 ते रात्री 12.00 पर्यंत भविकांना दर्शनासाठी मंदिर खुले ठेवण्यात येणार आहे. सर्व भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा.बुधवार दि. २६/०२/२०२५ रा. १० ते गुरुवार दि. २७/०२/२०२५ सकाळी ५ पर्यंत महाशिवरात्री जागरण कार्यक्रम, श्री नटराजा मंदिर ट्रस्ट, श्री नटराजा महिला मंडळ, योगदा सत्संग यांच्या सौजन्याने होणार आहे.

लोक कल्याणकारक अनुष्ठानाचा खर्च जनता जनार्दनांच्या सहभागातून व अर्थिक योगदानातून केला जातो. मंदिराच्या सर्वच कार्यक्रमास आपले मौलिक सहकार्य आम्हास लाभते. तरी महाशिवरात्री महोत्सवानिमित्त संपन्न होणाऱ्या अनुष्ठानास आपण तन-मन-धनाने सहभागी व्हावे  असे आवाहन नटराज मंदिराचे व्यवस्थापकीय विश्वस्त  रमेश शानभाग यांनी केले आहे.  सर्व कार्यक्रमास आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.

मागील बातमी
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने अभिजात मराठीचा ‘ऑनलाईन जागर’!
पुढील बातमी
मेढा एस. टी. डेपोसाठी मिळाल्या नवीन ८ गाड्या

संबंधित बातम्या