सातारा : पुरुष भिक्षेकरी गृहातून एकजण बेपत्ता झाल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनेश धरमसिंग यादव (वय 50, मुळ रा. उत्तरप्रदेश, सध्या रा. पुरुष भिक्षेकरी गृह, सातारा) हे दि. 5 ऑगस्ट रोजी बेपत्ता झाले आहेत. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार देशमुख करीत आहेत.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा