पाचपुतेवाडीत सातशे ग्रॅम मेफेड्रोन जप्त ; महसूल गुप्तचर संचालनालयाचा छापा; चौघांना ताब्यात घेतल्याची चर्चा; कारवाईने खळबळ

by Team Satara Today | published on : 25 January 2026


कराड  : कराड तालुक्यातील पाचपुतेवाडी येथे कराड तालुका पोलिसांच्या सहकार्याने महसूल गुप्तचर संचालनालय पथकाने शनिवारी रात्री छापा मारून बंद शेडमधून सातशे ग्रॅम मेफेड्रोन जप्त केल्याची माहिती आहे. या कारवाईबाबत प्रचंड गोपनीयता बाळगत या पथकाने जागा मालकासह तिघांना ताब्यात घेतल्याची चर्चा आहे. तपासाचा भाग म्हणून जिल्हा पोलिसांनी सुद्धा याबाबतची अधिक माहिती देण्यास नकार दिला आहे.या मेफेड्रोन ची किंमत कोट्यवधी रुपये आहे.

बामनोली येथे सावरी गावामध्ये 50 कोटीचे मेफेड्रोन मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेने कारवाई करून पकडले होते. या प्रकरणात सुद्धा दोघांना ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणावरून प्रचंड राजकीय रणकंदन झाले.अमली पदार्थ सातारा कनेक्शनची धुळ खाली बसत असताना कराड तालुक्यातील पाचपुतेवाडी तुळसण येथे कराड तालुका पोलीस व महसूल गुप्तचर यंत्रणा यांच्या संयुक्त सहकार्याने कारवाई करून 700 ग्रॅम मेफेड्रोन जप्त करण्यात आल्याची माहिती आहे. याप्रकरणी चौघांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे.अत्यंत गोपनीय पद्धतीने शनिवारी रात्री उशिरा तीन वाहनांमधून महसूल गुप्तचर यंत्रणेचे अधिकारी परिसरात दाखल झाले. यावेळी सर्व परिसरातील करण्यात आला होता पाचपुतेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या पिछाडीला असणाऱ्या बंदिस्त स्वरूपाच्या शेडवर छापा मारण्यात आला. या प्रकरणात काही बॅरल आणि द्रव स्वरूपातील मेफेट्रोन ताब्यात घेण्यात आले तसेच या संपूर्ण कारवाईचा रिचार्ज पंचनामा करण्यात येऊन त्या शेडवर कारवाईची नोटीस चिटकवण्यात आली आहे.

याबाबत पोलीस अधीक्षक तुषार दोशी  यांना सातारा जिल्हा पोलीस प्रमुख या नात्याने कारवाई संदर्भात विचारणा केली असता त्यांनी तुळसण प्रकरणाच्या कारवाईचा आमचा कोणताही संबंध नाही अथवा त्यांनी याबाबत सातारा पोलिसांना कोणतीही माहिती दिलेली नाही असे थेट उत्तर दिले. सातारा जिल्ह्यामध्ये मेफेड्रोन जप्त होण्याची गेल्या दोन महिन्यातील ही दुसरी कारवाई आहे.अशा पार्श्वभूमीवर सातारा पोलिसांची हात झटकण्याची ही भूमिका खरोखर आश्चर्य वाटायला लावणारी आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कोपर्डे येथे जुन्या भांडणाच्या कारणातून शेतमजुराला बेदम मारहाण ; सहा जणांवर गुन्हा
पुढील बातमी
कोडोलीच्या सुपुत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव; उस्मानाबादी शेळी संवर्धनासाठी 'NBAGR' कडून पशुपालक रामचंद्र केशव जाधव यांचा विशेष सन्मान

संबंधित बातम्या