सातारा : दारु पिवून सार्वजनिक शांतता बिघडवण्यासह एकास जखमी केल्याप्रकरणी एकाविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, येथील बसस्थानकात दारु पिवून आरडाओरडा केला तसेच पाण्याची बॉटल मारुन सुरक्षारक्षकाला जखमी करत, शिवीगाळ, दमदाटी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा नोंद झाला आहे. हा प्रकार दि. 9 रोजी रात्री 1.30 च्या सुमारास घडला. सातारा शहर पोलीस ठाण्यात मुकुंद मारुती जाधव (वय 45, रा. न्यू विकास नगर, सातारा) यांनी फिर्याद दिली असून, सचिन महादेव कासुर्डे (रा. सुमित्रा हौसिंग सौसायटी, गोडोली, सातारा) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस हवालदार सुडके तपास करत आहेत.