गोखळी पाटी ते गोखळी गावठान रोड रस्त्यांच्या कामासाठी बंद

by Team Satara Today | published on : 05 September 2025


सातारा : फलटण ग्रामीण पोलीस हद्दीत गोखळी पाटी ते गोखळी गावठाण रोड प्रजिमा ११ कि.मी. लांबीत रस्ता सुधारणेचे काम सार्वजनिक बांधकाम उपविभाग, फलटण यांच्याकडून करण्यात येणार  आहे.   हा रस्ता ८ सप्टेंबर २०२५ रोजी १२ वाजता पासून ते ७ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत बंद करण्यात येणार आहे. या अधिसुचनेव्दारे सर्व प्रकारच्या वाहनांना या रस्त्यावर प्रवेश बंद करण्यात येणार आहे.

नागरिकांनी या कालावधीत ये जा करण्यासाठी गोखळी पाटी ते राजाळे ते निरा वाघज मार्गे बारामती या पर्यायी मार्गाचा अवलंब करावा. नागरिकांनी या कालावधीत सदर रस्त्यावर प्रवास करणे टाळावे अणि पर्यायी मार्गाचा वापर करुन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन उप अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग फलटण यांनी केले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
ऊर्जा परिवर्तनामुळे विद्युत क्षेत्रात महाराष्ट्र हे देशातील ‘रोल मॉडेल’
पुढील बातमी
गडांचा राजा : राजगड

संबंधित बातम्या