सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराकडील रस्ता काही दिवस वाहतुकीसाठी बंद राहणार; पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन

by Team Satara Today | published on : 24 November 2026


सातारा :  जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा येथील मुख्य प्रवेशद्वारासमोरील रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे सदर रस्ता पुढील काही दिवसांसाठी वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे.
या कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची तसेच अधिकारी व कर्मचारी यांची गैरसोय होऊ नये, यासाठी पर्यायी मार्गाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दक्षिण दिशेकडील वाय.सी. कॉलेजच्या बाजूने जाणारा रस्ता पर्यायी मार्ग म्हणून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.
तरी जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्या सर्व नागरिकांनी तसेच अधिकारी व कर्मचारी यांनी मुख्य प्रवेशद्वारासमोरील बंद असलेल्या रस्त्याचा वापर न करता वाय.सी. कॉलेजच्या बाजूने असलेल्या दक्षिणेकडील पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
तारळे प्रकल्पावर मनसेचे आक्रमक ठिय्या आंदोलन; कार्यकर्त्यांचा धरणाच्या पाण्यात उतरून 'जलसमाधी'चा प्रयत्न, प्रकल्पाचे काम बंद पाडले

संबंधित बातम्या