सातारा शहर व तालुका परिसरातून वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जणांचे अपहरण

by Team Satara Today | published on : 19 October 2026


सातारा : सातारा शहर सह तालुका परिसरात घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जणांचे अपहरण केल्याप्रकरणी अज्ञाता विरोधात संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 17 रोजी दुपारच्या सुमारास सातारा तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या 19 वर्षीय युवतीचे अपहरण केल्याप्रकरणी अज्ञाता विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस हवालदार गायकवाड करीत आहेत.
दुसऱ्या घटनेत, रूपनारायण संतराम गौतम रा. सदर बझार, सातारा यांचे अपहरण केल्याप्रकरणी अज्ञाता विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस नाईक बोराटे करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सदर बझार येथून दुचाकीची चोरी; अज्ञातावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा
पुढील बातमी
आकाशवाणी झोपडपट्टीत दारूच्या नशेत एकाची गळफास घेऊन आत्महत्या

संबंधित बातम्या