सातारा : विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी तीन जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, डिसेंबर 2024 ते 11 जून 2026 दरम्यान प्राजक्ता सत्यजित घाडगे या विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी पती सत्यजित सयाजीराव घाडगे, सासू सत्वशीला सयाजीराव घाडगे, सासरे सयाजीराव शिवराम घाडगे सर्व रा. गोडोली सातारा यांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार भोंडवे करीत आहेत.