कृष्णा बंगला समोरील रोडवर सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल

by Team Satara Today | published on : 24 December 2025


सातारा : सदरबझार येथील शासकीय निवासस्थान असलेल्या कृष्णा बंगलासमोर मारामारी केल्याप्रकरणी चार जणांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बसवराज कांबळे, शिवम आवळे, प्रशांत कलाव आणि अमर कुसळकर यांच्यासह इतर चार जणांनी सदरबाजार येथील शासकीय निवास्थान असलेल्या कृष्णा बंगला समोरील रोडवर बेकायदेशीर जमाव जमवून आपापसात भांडणे करून एकमेकांना मारहाण, शिवीगाळ, दमदाटी करत पोलिसांसमक्ष सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी चार जणांसह इतर जणांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतची फिर्याद पोलीस हवलदार उदय यादव यांनी दिली असून अधिक तपास पोलीस हवालदार मेचकर करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा शहर पोलिसांचा सिव्हिल हॉस्पिटलनजीक जुगार अड्ड्यावर छापा
पुढील बातमी
बोरखळ आणि शाहूपुरी हद्दीतून दोन युवती बेपत्ता; सातारा तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद

संबंधित बातम्या