सातारा : युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकाविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, क्लीप दाखवयाची आहे, असे सांगून युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी संजय कदम (रा. मल्हारपेठ, सातारा) याच्या विरुध्द सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना दि. 2 एप्रिल रोजी घडली आहे. अधिक तपास महिला पोलीस नाईक देखणे करीत आहेत.
युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा
by Team Satara Today | published on : 04 April 2025