सातारा : बसस्थानकामधून दुचाकीची चोरी केल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा बसस्थानकामधून अज्ञात चोरट्याने एमएच 11 एक्यू 1672 या क्रमांकाची दुचाकी चोरुन नेली. ही घटना दि. 21 ऑक्टोबर रोजी घडली आहे. याप्रकरणी शोएब अल्लाउद्दीन पटेल (वय 22, रा.संभाजीनगर, सातारा) यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पुढील तपास महिला पोलीस हवालदार कदम करीत आहेत.
सातारा बसस्थानकामधून दुचाकीची चोरी; अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल
by Team Satara Today | published on : 02 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा