सातारा : वडील आणि मुलीला मारहाण केल्याप्रकरणी एका विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 15 रोजी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास पूजा कमलाकर पिसाळ रा. गंगासागर अपार्टमेंट, प्रतापगंज पेठ, सातारा यांचे वडील सतीश श्रीपती जाधव हे घरातील लाईट गेल्याने अपार्टमेंटच्या खाली मीटर बॉक्सचा खटका पडला का, हे पाहण्यासाठी गेले असता तेथीलच ओमकार अजय इनामदार याने सतीश जाधव यांना शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली. ही भांडणे सोडवण्यासाठी आलेल्या पूजा पिसाळ यांनाही ओमकार इनामदार याने मारहाण केल्याने त्या जबर जखमी झाल्या आहेत. याबाबतची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली असून अधिक तपास पोलीस हवालदार बाबर करीत आहेत.