फलटण : अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद फलटण तालुकाध्यक्ष, गुणवरे ग्रामपंचायत माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य ज्येष्ठ पत्रकार प्रा. रमेश आढाव सर यांचे दि. १८ जुलै रोजी वयाच्या ६४ व्या वर्षी हृदयविकाराने नागपूर येथे दुःखद निधन झाले हे आपणास ज्ञात आहे.
गेली ३०/३५ वर्षे फलटण तालुक्यात, किंबहुना सातारा जिल्ह्यात वृत्तपत्र क्षेत्राबरोबर राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असणारे प्रा. आढाव सर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी फलटण शहर व तालुक्यातील सर्व पत्रकारांच्यावतीने बुधवार दि. २३ जुलै रोजी दुपारी ३ वाजता महाराजा मंगल कार्यालय, फलटण येथे श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात येत आहे.
या सभेला फलटण शहर व तालुक्यातील सर्व समाज घटकांनी वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.