मुंबई : दिल्लीत आंदोलन करणाऱ्या तरुणांना रोखण्यासाठी पोलिसांकडून धरपकड सुरू आहे. यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टीने आंदोलनाची हाक दिली आहे. मात्र, जंतरमंतरवर आंदोलन सुरू होण्यापूर्वीच काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी सरकारच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले.
राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका करत सत्तेच्या बळावर देशातील यंत्रणांचा वापर केला जात असल्याचा आरोप केला. सरकारच्या धोरणांविरोधात आंदोलन करणाऱ्या नागरिकांना ताब्यात घेतलं जात असेल, तर ही लोकशाहीसाठी चिंतेची बाब असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. दिल्लीतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी मेट्रो आणि बस सेवा बंद केल्याच्या, रस्ते अडवल्याच्या आणि आंदोलकांना विमानातूनच ताब्यात घेतल्याच्या वृत्तांचा उल्लेख केला. देशातील तरुण आपल्या भविष्याबद्दल चिंता व्यक्त करण्यासाठी रस्त्यावर उतरत असताना त्यांना रोखण्याचा प्रयत्न का केला जातोय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
पुढे बोलताना, नागरिकांना आपल्या मताधिकाराबद्दल प्रश्न विचारण्याचा आणि त्याविरोधात शांततेत आंदोलन करण्याचा अधिकार असल्याचं त्यांनी म्हटलं. ''या देशातील तरुणांनी तुम्हाला झुकवलं आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यायला लावला हा राग अजून शमला नाहीये असं दिसतंय. अण्णा हजारे आंदोलनाच्या वेळेस मोदी-शाह गुजरातमध्ये आंदोलनं होऊ देत होते कारण ती फायद्याची होती. पण त्याच गुजरातमध्ये त्यांनी सत्तेच्या काळात त्यांच्या सरकारच्या विरोधातील अनेक आंदोलनं चिरडली. थोडक्यात हे बेगडी आणि दुटप्पी आहेत हे स्पष्ट दिसतंय'' असं ते म्हणाले.
आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने राज ठाकरे यांची केंद्र सरकारवर जोरदार टीका; ज्या देशाने परकियांचा माज उतरवला, तिथे स्वकियांचा माज जनता उतरवणार नाही वाटतं का?
by Team Satara Today | published on : 10 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा