सातारा : वीज वितरण कंपनीच्या वीजवाहक तारांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने अचानक विजेचा भार वाढल्याने पिरवाडी येथील गजानन विश्व गृहनिर्माण सोसायटीमध्ये अनेक नागरिकांच्या घरातील विद्युत उपकरणे जळाली .हा प्रकार शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या दरम्यान घडला सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र अनेकांच्या घरातील उपकरणे जळून तब्बल 12 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
येथील नागरिकांनी याबाबतचे निवेदन तयार करून तात्काळ याची कल्पना कृष्णानगर येथील वीज वितरण कार्यालयाच्या अधीक्षक अभियंत्यांकडे केली .वीज मित्रांच्या भरारी पथकाने तात्काळ येथे येऊन विद्युत रोहित्राचीतपासणी केली येथील भार नियंत्रक उपकरण जाळाल्याने हा प्रकार घडल्याचे सकृत दर्शनी दिसून येत आहे .मात्र नागरिकांच्या झालेल्या नुकसानीला जबाबदार कोण असा संतप्त सवाल येथील रहिवाशांच्या माध्यमातून विचारला जात आहे .गजानन विश्व सोसायटीमध्ये तब्बल 45 सदनिका धारक आहेत .शुक्रवार सकाळपासून येथे विजेचा लपंडाव तसेच कमी जास्त भार होणे असे तांत्रिक बिघाडाचे प्रकार सुरू होते सकाळी अचानकच विद्युत भार वाढल्याने बऱ्याच नागरिकांचे मीटर आउट होऊन जळाले .काही नागरिकांच्या घरातील संगणक वॉटर हीटर टीव्ही फ्रिज इत्यादी इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले .सुदैवाने या प्रकारामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही मात्र वित्तहानी मोठ्या प्रमाणावर झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे .
सोसायटीच्या समितीच्या माध्यमातून याबाबत कृष्णानगर येथील वीज वितरण मंडळाच्या कंपनीला याबाबत तात्काळ कल्पना देण्यात आली आणि पंधरा रहिवाशांची घरातील विद्युत उपकरणे जळाल्याची त्यामध्ये तक्रार करण्यात आली. वीज वितरणच्या भरारी पथकाने तात्काळ रोहित्राचीतपासणी केली असता ट्रान्सफॉर्मरमधील डीओ जळाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. विद्युत बाराचा तांत्रिक बिघाड आणि त्याचे नुकसान आमच्या माथी का ? असा संतप्त सवाल येथील रहिवाशांनी केलेला आहे. याबाबत वीज वितरण कंपनीने संबंधित रहिवाशांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी त्यांची मागणी आहे. शनिवारी येथील नागरिक जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची भेट घेऊन त्यांना नुकसान झाल्याबाबतचे निवेदन सादर करणार आहेत.