खुन प्रयत्नाच्या गुन्ह्यातील फरार जेरबंद

सातारा पोलीस गुन्हे प्रकटीकरणची कारवाई

by Team Satara Today | published on : 29 December 2024


सातारा : खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल असलेल्या एका फरार आरोपीला सातारा शहर पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरणच्या पथकाने अटक केली.

आप्पा मोहन भवाळ (वय २८,रा. प्रतापसिंहनगर, सातारा) असे अटक झालेल्या संशयिताचे नाव आहे. बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात २ फेब्रुवारी २०२४ रोजी संग्राम उर्फ माऊली तानाजी बोकेफोडे (रा. संगमनगर, सातारा) याला काही युवकांनी गंभीर मारहाण केली होती. या प्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळी अन्य आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. परंतु आप्पा भवाळ हा गुन्हा घडल्यापासून फरार होता. या काळात तो पुणे येथील मुंडवा परिसरात रिक्षा चालवत होता. एवढेच नव्हे त्याने स्वत:चे नाव व गावाचा पत्ताही लोकांना खोटा सांगून वावरत होता. ही सगळी माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांच्या पथकातील पोलिस उपनिरीक्षक सुधीर मोरे, हवालदार नीलेश यादव, सुजीत भोसले, नीलेश जाधव, विक्रम माने, पंकज मोहिते यांचे पथक पुण्याला रवाना झाले. या पथकाने पुण्यातील मुंडवा येथील सर्व रिक्षा थांब्यावर जाऊन भवाळ याचा शोध घेतला. त्यावेळी एका रिक्षा थांब्यावर पोलिसांच्या पथकाने त्याला पकडले.

या कारवाईबद्दल पोलिस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलिस अधीक्षक वैशाली कडूकर यांनी पथकातील कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
खंडोबा मंदिरात सोमवती अमावस्येनिमित्त भंडारा
पुढील बातमी
आर्थिक फायद्याच्या अमिषाने दोनजणांचा सुमारे 15 लाखांना गंडा

संबंधित बातम्या