ब्रिक्स शिखर परिषदेमध्ये भारत-चीन संबंधांना नवी दिशा; दोन्ही देशांनी परस्पर विश्वास आणि सहकार्य वाढवण्यावर भर दिला

by Team Satara Today | published on : 13 September 2026


दिल्ली : ब्रिक्स शिखर परिषदेतून भारतासाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि सकारात्मक बातमी समोर आली आहे. BRICS शिखर परिषदेत भारत आणि चीनमधील संबंधांना नवी दिशा देण्याचे संकेत मिळाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यातील चर्चेत दोन्ही देशांनी परस्पर विश्वास आणि सहकार्य वाढवण्यावर भर दिला.
दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये गेल्या काही वर्षांत सीमा व इतर मुद्द्यांवरून तणाव निर्माण झाला होता. मात्र, BRICSच्या व्यासपीठावरून दोन्ही देशांनी मतभेद संवादातून सोडवण्याबरोबरच आर्थिक, सांस्कृतिक आणि प्रादेशिक सहकार्य वाढवण्याची भूमिका मांडली. तसेच, या ऐतिहासिक परिषदेत दोन्ही देशांमध्ये ७ महत्त्वाच्या मुद्द्यांवर सहमती दर्शवण्यात आली आहे.
भारत-चीनमध्ये ७ महत्त्वाच्या मुद्द्यांवर सहमती
    संबंधांकडे धोरणात्मक आणि दीर्घकालीन दृष्टिकोनातून पाहिले जाईल.
    मतभेदांचे रूपांतर वादात होऊ दिले जाणार नाही.
    सीमा विवादावर निष्पक्ष आणि दोन्ही देशांना स्वीकारार्ह तोडगा शोधला जाईल.
    व्यापारी आणि सांस्कृतिक संबंधांना अधिक चालना दिली जाईल.
    दोन्ही देशांतील नागरिकांची परस्पर ये-जा वाढवली जाईल.
    आर्थिक आणि व्यापाराशी संबंधित चिंता दूर करण्यासाठी प्रयत्न केले जातील.
    प्रादेशिक आणि जागतिक आव्हानांवर भारत-चीन सहकार्य वाढवले जाईल.
'मतभेद असतील, पण ते वादात बदलता कामा नयेत'
पंतप्रधान मोदी यांनी भारत आणि चीनमध्ये मतभेद असल्याचे मान्य केले. मात्र, हे मतभेद संघर्ष किंवा वादाचे कारण ठरू नयेत, असे त्यांनी स्पष्ट केले. थर, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनीही भारत आणि चीन हे जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले दोन देश तसेच ‘ग्लोबल साउथ’मधील महत्त्वाचे सदस्य असल्याचे नमूद केले. त्यामुळे दोन्ही देशांवर मोठी जबाबदारी असून त्यांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
स्वतःला मध्य प्रदेशचा मुख्यमंत्री घोषित करत अभिजीत दीपके यांचा राजीनामा; राजीनाम्याच्या पोस्टमुळे वाद , कायदेशीर कारवाईसह FIR नोंदवण्याची मागणी
पुढील बातमी
मुंबईकडे कूच करण्यावर मनोज जरांगे ठाम; सरकारला पुन्हा आठ दिवसांची मुदत, १९ सप्टेंबरपासून मुंबईत उपोषण सुरू करू

संबंधित बातम्या