विभागस्तरीय जलतरण स्पर्धेसाठी कस्तुरी साबळेची निवड

वडूथ विद्यालयातील विद्यार्थिनी; वैयक्तिक खेळ प्रकारात प्रथम क्रमांक

by Team Satara Today | published on : 14 September 2025


सातारा, दि. १४ : जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी सातारा कार्यालयाच्या वतीने घेतलेल्या शालेय जलतरण स्पर्धेत १४ वर्षाखालील वयोगटात मुलींमध्ये इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज, वडूथ विद्यालयातील विद्यार्थिनी कस्तुरी अमोल साबळे हिने १०० मीटर बेस्ट स्ट्रोक, २०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक, २०० मीटर वैयक्तिक मिडले या तिन्ही वैयक्तिक खेळ प्रकारात प्रथम क्रमांक मिळवला. 

तसेच ४ x १०० फ्री स्टाइल रिले व ४ x १०० मिडले रिले या प्रकारात द्वितीय क्रमांक मिळवला. तिची विभागस्तरीय जलतरण स्पर्धेसाठी निवड झाली आहे. कस्तुरीला प्रशिक्षक विजय साबळे, साबळे परिवार वडूथ, सुधीर चोरगे, महेश मिलके, गौरी मिलके यांचे मार्गदर्शन लाभले या यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
99 व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी पानिपतकार विश्वास पाटील
पुढील बातमी
२३.७५ लाखांच्या फसवणूकप्रकरणी राजेंद्र काकडेवर गुन्हा

संबंधित बातम्या