जीएसटीच्या नव्या कर रचनेमुळे जनतेच्या जीवनशैलीला चालना

आमदार सिद्धार्थ शिरोळे ; वन नेशन वन टॅक्स योजना महत्त्वाची

by Team Satara Today | published on : 12 September 2025


सातारा, दि. १२ :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 19 व्या स्वातंत्र्य दिन लाल किल्ल्यावरून जाहीर केलेला संकल्प प्रत्यक्षात आला आहे. जीएसटीच्या स्लॅब मध्ये बदल करण्यात आल्याने देशाच्या अर्थव्यवस्थेबरोबर जनतेच्या जीवनशैलीला नवीन चालना मिळेल या माध्यमातून वन नेशन वन टॅक्स ही योजना अस्तित्वात आणण्यात आली आहे असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे आमदार सिद्धार्थ शिरोळ यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

साताऱ्यात येथील विश्रामगृहात शिरोळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेठवार, माजी शहराध्यक्ष विकास गोसावी व पदाधिकारी उपस्थित होते.

आ. शिरोळे म्हणाले, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून तब्बल 67 वर्ष 2014 पर्यंत देशाच्या आर्थिक वाटचालीचा वेग संथ राहिला. या काळात देशाचे स्थूल राष्ट्रीय उत्पन्न केवळ 2.4 ट्रिलियन डॉलर पर्यंत पोहोचले होते मात्र नरेंद्र मोदी सरकारने आर्थिक सुधारणांचा वेग वाढवणे ही गरज ओळखून सुधारणांना बळ देणाऱ्या योजना आखण्यावर लक्ष केंद्रित केले . जीएसटी कर आकारणीचा पहिला टप्पा एक जुलै 2017 रोजी सुरू झाला त्याआधी 17 वर्ष देशाला अशा कर रचनेची केळ प्रतीक्षा होती आज देशातील 25 कोटी लोकसंख्या दारिद्र्य रेषेखालून बाहेर आली आहे आणि देशाची अर्थव्यवसाय जागतिक स्तरावर चौथा क्रमांक पोहोचली आहे जागतिक पातळीवर आर्थिक अस्थिरतेच्या काळात भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर पोहोचणार असल्याचा निर्वाळा जागतिक वित्त संस्थांनी दिला आहे.

सध्याच्या चार स्तर कररचनेचे सुसुत्रीकरण करून केवळ 18 टक्के आणि 5 टक्के एवढ्या दोन स्तरात नवीन जीएसटी आकारणी होणार आहे .अनेक जीवनावश्यक वस्तूंवरील करांचा बोजा हलका किंवा नाहीसा होणार आहे त्यामुळे सामान्य माणसाचं शेतकरी, मध्यम लघुउद्योग क्षेत्र, मध्यमवर्गीय समाज घटक , महिला, युवा वर्ग यांना या सुधारणांचा फायदा होणार आहे आणि व्यावसायिकांना व्यवसाय सुलभतेचा आनंद घेता येणार आहे, असे ते म्हणाले.

काँग्रेसचे हीन दर्जाचे राजकारण 

प्रत्येक मुद्द्याला राजकीय रंग देण्याची घाणेरडी सवय काँग्रेसला लागली आहे त्यांचे हीन दर्जाचे राजकारण त्यांना लखलाभ असो. मोदी सरकार मात्र सर्व वर्गातील जनतेचे भले करण्यासाठी विकासाचे राजकारण करत राहणार,  असा विश्वास शिरोळे यांनी व्यक्त केला .


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पीठ मळल्यानंतर किती तासात खराब होतं?
पुढील बातमी
खंडाळ्यात दोन वाहनांना धडक देऊन ट्रेलर पलटी

संबंधित बातम्या